ठाणे : दै. जनादेशच्या १३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये दुपारी चार वाजता 'जनादेश गौरव संध्या' सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील महनीय व्यक्तींपासून कला-संस्कृती अन् शैक्षणिक क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या विभुतींचा परिसस्पर्श लाभणार आहे. याच सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तबगारीची मोहर उमटवणान्या १५ अवलियांना यंदाच्या 'जनादेश गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात हास्यसम्राट जॉनी रावत यांच्यासह शाहिरी कलेचाही आस्वाद घेता येणार आहे. पत्रकार, लेखक, कवी, नाटककार प्रशांत डिंगणकर, ढोलकीच्या तालावर मंत्रमुग्ध करणारा चिमुरडा तेजस मोरे, कवी, लेखक डॉ. राम पंडीत; प्रख्यात रंगावलीकार विरेश वाणी; अंधअपंगांसाठी, आदिवासी-शोषीतांसाठी अहोरात्र झटणान्या वैशाली मजहर शेख, स्केटींगचा गीनीज विक्रम प्रस्थापित करणारी चिमुरडी तनिष्का मोरे, डॉ. विजय जोशी; युवा ढोलताशा पथकाचे व्यवस्थापक वैभव म्हस्के; चिमुकला गायक संगीत फुलोरे; मागास भागातील नागरिकांच्या उत्कर्षासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या प्रमिलाताई कोकड; अनेक आजारी जीव वाचवणारे देवदूत डॉ. सचिन वाणी; जादूगार ज्ञानेश्वर; ज्येष्ठ गायक - गीतकार मधुकर घुसळे संदीप शेजुळ आणि लहू जाधव अशी या दोघांची नावे आहेत. अशा १५ जणांना यंदा जनादेश सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
जनादेश गौरव पुरस्कार जाहीर :३१ डिसेंबरला होणार वितरण