कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होण्मया कोणालाही वायावर सोडले जाणार नाही. बाधितांना पूर्ण नुकसान भरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची कामे केली जातील, अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. तसेच, २७ गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री शिदे यांनी एमआयडीसीच्या अधिकायांना दिले असून वाढीव पाणीपुरवठ्या बाबतचा निर्णय मंगळवारी आयोजित बैठकीत होणार आहे. कल्याण-शीळ रस्त्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टप्पा, चक्की नाका ते नेवाळी रस्ता तसेच मानपाडा रोड या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, या रुंदीकरणात बाधित होण्या ग्रामस्थांचे काही आक्षेप होते. त्यासंदर्भात पालकमंत्री शिदे यांच्या मंत्रालयातील दालनात मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.