पनवेल नवीन पनवेलमध्ये पकडण्यात आलेल्या ३५ लाखांची रक्कम ही नव्या २ हजार रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत. पनवेलमधील खांदेश्वर पोलिसांनी ३५ लाखांच्या नव्या नोटा व २ किलोंची सोन्याची बिस्किटेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नवीन पनवेलमध्ये हा कारवाई करण्यात आली. नवीन पनवेलमध्ये पकडण्यात आलेली ३५ लाखांची रक्कम ही नव्या २ हजार रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. जप्त करण्यात आलेले २ किलो सोने नेमके कुणाचे आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील चौघे हे सोनाराचे काम करणारे आहेत. तर दोघे व्यापारी आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेले ६ जण नोटा बदलण्यासाठी आले होते का? तसेच कोणत्या व्याप्पयाला सोने देण्यास आले होते याचा तपासही पोलीस करत आहेत. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. या सहा जणांना रोख रक्कम व सोन्याच्या बिस्किटासह नाकाबंदीवेळी पकडण्यात आले होते.
पनवेलमधून ३५ लाखांच्या नव्या नोटा, २ किलो सोने जप्त