कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जेष्ठ पत्रकार आणि बाजार समितीचे संचालक रविंद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आधीचे सभापती अरुण पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी रवींद्र घोडविंदे यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने घोडविंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, समाजसेवक सोन्या पाटील आदींसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी जेष्ठ पत्रकार रवींद्र घोडविंदे