कल्याण : युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पारंगत होण्यासाठी जास्त वेळ अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तर अभ्यास करताना आपण हि परीक्षा देवून एखाद्या मोठ्या पदावर जायचं आहे हे आपल्या मनात दृढ निश्चय करायला पाहिजे असे डॉ. रुपिंदर कौर यांनी असे मत व्यक्त केले. महेंद्र लक्ष्मण म्हात्रे पदवी महाविद्यालय रंजणोली भिवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युपीएससी एमपीएससी मार्गदर्शन शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बी आर साळवे, महाविद्यालयाचे अध्यक्ष करसन ठाकरे, एनएसएस प्रोग्राम ऑफिसर इरफान सय्यद, सोनाली सोनावणे, परीक्षा विभागाचे धनंजय पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. __ युपीएससी एमपीएससीच्या परीक्षांकडे आज विद्यार्थी मोठ्या संख्येने वळत आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा उद्देश समोर ठेवत ययपीएससी एमपीएससी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परीक्षेची तयारी कशी करावी, कोणते विषय निवडावे, कोणत्या विषयाचा अभ्यास जास्त करावा, अभ्यास किती वेळ करावा, विद्यार्थ्यांनी टी.व्ही. पाहताना बातम्यांकडे जास्त लक्ष द्यावे आणि त्यातून आपल्या अवतीभवती घडणा-या घडामोडींचा अभ्यास करावा तसेच आपल्याकडे जागतिक राजकीय तक्ता आणि भारतीय राजकीय तत्तता आसणे आवश्यक आहे असे त्याने मोलाचे मार्गदर्शन रुपिंदर कौर यांनी केले. त्याचप्रमाणे आपन करत असलेल्या अभ्यासात सातत्य टिकून राहणे आवश्यक असल्याचेही सांगितले. समाज सेवा फाउंडेशनच्या देवेन्त्री शर्मा यांनी ज्यांना समाजसेवेची आवड आहे तर ह्या सेवेत राहून समाजसेवा करू शकतो ह्याबाबत मार्गदर्शन केले.
युपीएससी एमपीएससीसाठी मनाशी दृढनिश्चय आवश्यक : डॉ. रुपिंदर कौर