स्टॉलवर कारवाई केल्याने विक्रेत्याने फेकली प्रभाग अधिकाऱ्यावर शाई

केडीएमसीचे वादग्रस्त क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्यावर एका वाडा पाव विक्रेत्याने शाईफेक केल्याने पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण सत्र न्यायालया नजीक असलेल्या वडा पावच्या स्टॉलवर कारवाई केल्याने शाई फेकण्यात आली असून शाईफेक करणाया श्याम क्षिरसागर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पालिका कर्मचायांनी काम बंद आंदोलन पुकारले. दरम्यान पालिका कार्यालयातील कर्मचायांनी क्षीरसागरला चांगलाच चोप दिला. यावेळी पालिका अधिकारीवानखेडे यांच्या आदेशानुसार कर्मचायांनी या घटनेचे वार्तांकन करणाया अशोक कांबळे या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करून कॅमेरा हि फोडला. याबाबत देखील पालिका अधिकारी वानखेडे आणि कर्मचायांच्या विरोधात पत्रकार कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण स्टेशन परिसरात असणाया शाम क्षिरसागर यांच्या शिववडापावच्या गाडीवर काही _दिवसांपूर्वी पालिकेने कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान गाडीवर असणाया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमाही तोडण्यात आल्याचा आरोप श्याम क्षिरसागर यांनी केला. त्याच्या निषेधार्थ आपण प्रभाग अधिकायांच्या अंगावर शाई फेकल्याचेही क्षिरसागर याने सांगितले. महापालिका मुख्यालयाबाहेर असणाया 'क' प्रभाग क्षेत्र कार्यालयात वानखेडे उपस्थित होते. गाडीवरील कारवाई केल्यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यासाठी आल्याचे सांगून क्षिरसागर यांनी वानखेडे यांच्या कार्यालयात प्रवेश करीत वानखेडे यांच्या अंगावर शाईफेक केली. अचानक झालेल्या या प्रकाराने अरुण वानखेडे यांच्यासह सर्वच जण हबकून गेले. तर या प्रकरानंतर तिथे असणाया पालिका कर्मचायांनी क्षिरसागरला एका खोलीत डांबून ठेवले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. क्षीरसागरला बाहेर काढताच संतापलेल्या कर्मच्यांनी त्यांना बेदम चोप दिला. या दरम्यान घटना स्थळी उपस्थित असलेले पत्रकार अशोक कांबळे यांना देखील पालिका कर्मचायांनी धक्काबुक्की करत कॅमेरा फोडला. दरम्यान शाई फेक प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी क्षिरसागरला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करत बाजारपेठ पोलीस पुढील । तपास करीत आहेत. याबाबत अरुण वानखेडे यांनी आपण स्टेशन परिसरात केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आपल्यावर शाईफेक करण्यात आली असून याप्रकरणी आपण गुन्हा दाखल केल्याचे सांगितले तर पत्रकाराचा कॅमेरा आपल्या कर्मचायांनी फोडलेला नसून भिंतीवर आपटल्या मुळे त्याचा कॅमेरा तुटल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान अरुण वानखेडे याची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून अनेकदा पालिकेतील लोकप्रतिनिधीनी वानखेडे कारवाईत दुजाभाव __ करत असल्याचा आरोप केला आहे. स्टेशन परिसरतील फेरीवाले आणि व्यापारी यांच्याशी अर्थपूर्ण संबध ठेवणाया या अधिकायावर कारवाई करण्याची मागणी यापूर्वी अनेक नगरसेवकांनी केली आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला पाठींबा मिळत असल्यामुळे पालिका मुख्यालया समोर व्यापायांच्या तीन आणि चार मजली इमारती डौलात उभ्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर यांनी क्षीरसागरच्या कृत्याचे समर्थन करत येणार नाही मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी वानखेडे हे मनमानी कारवाई करत असून वानखेडे यांच्या कार्यप्रणाली बाबत । महासभेत देखील नगरसेवकांनी विरोध करत वानखेडेवर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे वादग्रस्त वानखेडे यांच्यवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी राजकीय पक्षांसह नागरिकांकडून जोरधरू लागली आहे.