ठाणे प्रतिनिधी :सुंदर ठाण्यासाठी ठाण्याची स्मशानभूमी करण्याचे ठराव करता, जे नगरसेवक झोपडपट्टीतील नागरिकांच्या मतांवर सभागृहात आले. त्याच झोपड्यातील महिलांचे कुंकू पुसणार, मुलांचे आयुष्य उध्वस्त करणार याला जबाबदार कोण? असा सवाल आव्हाड यांनी केला. आज राजीनामे दिले ते माननीय शरद पवार यांच्या आदेशानेच, त्यांच्याच आदेशाने धनंजय मुंडे यांनी सभागृहात विषय मांडला आणि त्यावर सभापतींनी स्थगिती दिली. त्यानंतर पालिकेच्या महासभेत झोपड्या तोडण्याचा ठराव करण्यात येतो हे दुर्दैव आहे जर सिस्टीम गरिबांना न्याय देत नसेल तर गुन्हेगारी आणि नक्षलवादी निर्माण होतात.तेव्हा या ठाण्यात एकही घर पाडू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषदेत आमदार आव्हाड यांनी मांडली. बाधित सौंदर्याच्या नावाखाली ठाण्याला स्मशान करण्याचा घातलेल्या घाटाला ठाणे राष्ट्रवादीने तीव्र विरोध करीत राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी पालिका महापौर संजय मोरे आणि पालिका आयुक्त यांच्याकडे यांच्याकडे सुपूर्द केले. . ज्या माणसांच्या मतांवर सत्तेत बसलात आता त्यामाणसाची मळकट कपडे तुम्हाला आता आवडत नाहीत. मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत खाडी किनारच्या झोपड्या तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करीत ठराव करण्यात आला. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा परिसरातील मनोहर साळवी, मिलिंद पाटील,अपर्णा साळवी,मनाली पाटील,महेश साळवी मनीषा साळवी, रिटा यादव, मुकुंद केणी, प्रमिला केणी आणि अक्षय ठाकूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तर मुकुंद केणी आणि प्रमिला केणी बाहेर असल्याने त्यांनी । अद्याप राजीनामे दिले नाहीत. १९८० पासून राहण्या नागरिकांना हाकलून लावून बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आघाडीचे सरकार असताना अनधिकृत इमारती तोडण्याच्या आदेशाला शरद पवारांनीच थांबविले होते. तेव्हा शिवसेनेचे नेते आणि आजचे पालकमंत्री यांनी पवार साहेबांची भेट घेतली होती. महासभेत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. ठाणे हे कष्टकरी आणि गरिबांचे शहर आहे. ते उध्वस्त करू नका, आज झोपड्या तोडण्याचे ठराव करतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे याच झोपडपट्टीवासियांच्या आधाराने वर आले. त्यांच्या प्रभागात अडीचलाख झोपड्या वनखात्याच्या जागेवर आणि अडीच लाख एमआयडीसीच्या जागेवर आहेत. जर सर्व इमारती तोडण्याचा विचार केला तर ७२ टक्के ठाणे अनधिकृत आहे. ठाण्याच्या सुंदरतेसाठी जर इमारती तोडल्या तर ठाण्याची सुंदर स्मशानभूमी होईल असा आरोप आणि वल्गनात्मक टोला आ. आव्हाड यांनी लगावला. महासभेत झोपड्या तोडण्याचा ठराव करणारे ९० टक्के नगरसेवक हे झोपडपट्टीतुन इमल्यात गेले आहे. आज त्याच झोपड्यांवर बुलडोजर चालविण्याचा ठराव करता म्हणजे तुम्हाला माणुसकीचे भानच राहिले नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला.
सौंदर्याच्या नावाखाली ठाणे स्मशान करणार काय ? एकही घर तोडू देणार नाही -आ. जितेंद्र आव्हाड