ज्या देशाचा नेता व्यापारी.....त्या देशाची जनता भिकारी

भारत देश हा लोकशाही प्रदान देश आहे. देशाच्या सत्तेवर बसलेल्या प्रत्येक नेत्याने आजवर केवळ संविधांचे नाव घेत मनमानी कारभार करीत देश चालविलेला आहे. लोकशाही हि जरी लोकांसाठी असली तरीही लोकांच्या भल्याचे आमिष दाखवीत नेते हे संशोधन करीत असल्याचे चित्र आजवरच्या कारभाराने पाहायला मिळाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. कला पैसा बाहेर काढण्यासाठी पण कला पैसाच आढळला नाही असे वास्तव आहे. या देशात लोकशाही असताना सर्वसामान्य आपल्या कमाईचा हिस्सा ही आपल्या बँकेत ठेऊ शकत नाही हे विदारक चित्र आज आहे. पोलिटिवस शास्त्र आणि चाणक्य नीतीत एक वाक्य आहे. ठ ज्या देशाचा राज्यकर्ता हा व्यापारी.... त्या देशाची जनता सदा भिकारीठ याची आठवण झाली. अन हे वाक्य आजच्या स्थितीला सार्थ ठरत आहे. नोट बंदीने देशातील व्यापरी आणि उद्योगपती, पुंजीपती यांना याचा फरक जाणवत नाही. पण सर्वसामान्य माणसाला मात्र याचा इतका फरक जाणवला किया नोट बंदीत नियोजन नसल्याने लोक पैसे खिशात असतानाही वडापाव खाण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. हि विदारकता नोटबंदीची म्हणण्यापेक्षा ही विदारकता मात्र नोट बंदी करताना न करण्यात आलेल्या नियोजनाचा फटका म्हणावा यात शंका नाही. आज देशातील जनतेचे इतके हाल झालेत याचा अंदाज घेणे कठीण आहे. कारण एटीएम मध्ये पैसे नाहीत, लांबच लांब असलेल्या रांगा, बँकेत पैसे काढण्यावर मर्यादा, सत्या ... बाजारात १००० आणि ५०० च्या नोटांचा पतपुरवठा नाही. केवळ सुरेश साळवे २००० च्या नोटा बाजारात आल्याने लोकांना सुट्ट्या पैशाची चन चन जाणवू लागली. दरम्यान खिशात जुन्या नोटा बँकेत भरण्याशिवाय पर्याय नाही दुसरीकडे खिशात २००० ची नोट सुटते देत नाही म्हणून काही कामाची नाही अशी अवस्था हि नागरिकांची झाली. पंत प्रधान मोडी यांनी काळा पैसा या विषयावर सर्वकाही निभावून नेले खरे पण आज नाही तर उद्या लोक काळा पैसा कुठे आहे याचा जाब विचारतील. वर्षानुवर्ष भारताच्या लोकशाहीला कलंकित करणारा भ्रष्टाचार फोफावला असताना काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी हा खटाटोप केला. बँकेच्या रांगेत सर्वच लोक दिसले मात्र एकही व्यापारी दिसला नाही, चहाचा बड़ा व्यापारी, उद्योगपती, कंपनी चालविणारे असे अनेक बडे लोक कधी बँकेत दिसले नाहीत. मोदीच्या नोटबंदीने एक चित्र दिसले. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते बँकेच्या रांगेत दिसले, याचाच अर्थ जे रांगेत नव्हते थेट बँकेच्या मेनेजर यांच्या मर्जीत होते काळा पैसा त्यांनी झटक्यात पांढरा केला ते सव असल्याचे चित्र आणि मनोदय पंतप्रधान मोडी यांचा असल्याचे चित्र दिसतंय. मोडी भलेही भारताचे पंतप्रधान आहेत पण ते गुजरातचे मुख्यमंत्री ही आहेत. म्हणून लोक म्हणतात ठ मोदी गुजरातचे सीएम आहेत, अन भारताचे पीएम आहेतठ देशात काळा पैसा आजही आहे आणि उद्याही राहणार यात शंका नाही अन पूर्वी हि होता. उगीच कुणाच्याही चौकश करायच्या , कालपर्यंत पायी फिरणारा माणूस नगरसेवक झाला कि झोपडी जाते आणि बंगला येतो, अलिशान गाडी येते खया अर्थाने हा काळा पैसा आहे. पण त्याकडे लक्षच नाही. उद्योगपती हे काळा पैसा बाळगतात त्यांच्याकडे लक्ष ठेव्न्येवजी ज्यांच्या बँकेत पैसाच राहत नाही अशा लोकांच्या मागे ससेमिरा लावण्याचे काम करण्यात येत आहे. या कार्याप्रनालीने गरीब गरीबच राहणार आणि श्रीमंत श्रीमंत राहणार हि सत्यता आहे. चाणक्यांच्या नीतीनुसार ज्या देशाच्या उच्च पदी व्यापारी, त्या देशाची जनता सदा भिकारी' याची साक्ष आज खया अर्थाने पटली. आज सर्वसामान्य माणूस जितका त्रासलेला आहे. कदाचित आयुष्यात हि प्रथम वेळ त्या माणसाच्या आयुष्यात असेल, खिशात पैसे असताना खूप लोकांना उपाशी मारताना पहिले साळवे आहे. पण यावेळी मात्र पैसा खिशात असतानाही १० रुपयाचा वडापाव खाण्याची लायकी सर्वसामान्य माणसात राहिली नसल्याचे दिसत आहे. काही दिवस थांबा कुणीही सुटणार नाही अशी आरोळी पंतप्रधान देत आहेत, पण मोदिजी अहो , कधी सुटणार नाही अहो प्रथम भ्रष्टाचार बुडवा याने सर्वसामान्यांना फरक पडणार नाही. पण नोट पुरवठा बँकेत करा मग लोकांना काही वाटणार नाही कारण ज्याच्याकडे आहे त्याला चिता सामाण्याचे कष्टकरी यांचे काय आज खाल्ले उद्याचे उद्या बघू अशी अवस्था आहे. पण चलनात सुटते पैसेच नसल्याने दोन हजाराची नोट घेऊन काय करायचे हा महत्वाचा प्रश्न आहे. मोदिजी यांनी चुकीचे केले असे आमचे म्हणणे नाही पण नियोजन मात्र एकदम खालच्या दर्जाचे केले हे वास्तव आहे. मग भले हि मोदी आपल्या कौशल्याने लोकांना लपेटू यात शंका नाही.आज भलेही देहातल लोकांना मोदिजी मुदत मागित आहेत. पण परिणाम काहीच होणार नाही हि सत्यता आहे. मोदिनी केलेल्या नोटबदीमुळे आता ५० दिवसात लोकांची सुटका होणार नाही तर हा परिणाम अनेक महिने अजून लोकांना भोगायचे आहे. कारण मोदींना हि या गोष्टीची कल्पना आहे म्हणूनच ५० टक्के पेक्षा अधिक जनता हि संगणकीय प्रनालीपासून, केशलेस प्रणालीला लायक नसलेल्या लोकांमध्ये केशलेस व्हा असा जागर करीत आहेत. हा प्रकार म्हणजे ठअंध्ल्यांच्या वस्तीत, चष्म्याचे दुकान थाटण्याचा प्रकार आहे हे विसरून चालणार नाही.