गोळीबारातून झालेल्या मृत्युच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा

कल्याण शिळफाटा रस्त्यावर असलेल्या काटई नाक्यावर मंगळवारी दुपारच्या दरम्यान एका बिल्डरच्या अंगरक्षकावर मारेकयांनी गोळीबार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने संतप्त शिवसैनिकांनी बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. हल्ल्यात मरण पावलेल्या विकी शर्माचा मृतदेह शवविच्छेदनंतर शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला होता. मारेकयांना अटक करेपर्यंत मृतदेह नेणार नाही अशी मागणी सैनिकांनी पोलिसांकडे केली. मात्र यावेळी अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार आणि प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी शिवसेना पदाधिकायांची समजूत काढून लवकरात लवकर आरोपींना अटक करू असे आश्वासन दिले. __ आमित पाटील आणि विक्की शर्मा यांची अंगकाठी सारखीच असल्यामुळे अमितला मारण्यासाठी आलेल्या मारेकयाने चुकून अंगरक्षक विक्की याच्यावर गोळीबार केल्याची घटना काटईनाका येथे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दिसण्यातील साम्यच विकीच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. शिवसैनिक अमित पाटील याला मारण्यासाठी आलेल्या मारेकयानी त्याच्याच सारख्या दिसण्या त्याचा अंगरक्षक विकी शर्मा यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात विक्की शर्मा याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ह्या गोळीबारात झालेल्या मृत्युच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत मयत विकी शर्माचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला होता. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिदे, आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, कल्याण युवा जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे, युवा सेना तालुका अधिकरी योगेश म्हात्रे, युवा सेना कल्याण तालुका सचिव मुकेश भोईर यांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले होते. मारेकयांना अटक करण्याची मागणी यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली. पोलीस उपायुक्त भाजीभाकरे म्हणाले, विकी शर्मा हा अमित पाटील यांचा अंगरक्षक होता. शिवसेना पदाधिकारी यांनी या हत्येच्या प्रकरणाचा तपास तातडीने करावा आणि मारेकयांना अटक करा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी १२ ते १३ तासात भरपूर पुरावे जमा केले आहे. मारेकयापर्यत लवकर पोहोचू. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी थेट गृहमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका करीत गृहखाते कमी पडत असल्याचे सांगितले.