वन हक्कासाठी १७ फेब्रुवारीला श्रमजीवी काढणार मोर्चा वन

 



आदीवासी बांधवांना त्यांच्या मुलभूत हक्कासाठी आजही लढा द्यावा लागत आहत आहे.त्यांच्या या विविध समस्यांसह वन हक्क मिळवून देण्यासाठी तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने येत्या १७ फेबुवारीला निर्धार मोर्चाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना दिले. देशाची ७५ वी सर्वत्र साजरी करण्यात आली असली तरी आजही की आदिवासी बांधवांना आपल्या मुलभूत हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे. त्यात अदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या मायामाता


वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबध्द कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखालील जागा नावे करणो, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षाची जाचक अट रद्द करणो, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणो, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबियाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यासाठी हा मोर्चा श्रमजीवी संघटनेकरून करण्यात येत असल्याचे संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली. जिल्ह्यातील लाखो आदिवासी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार आहे. ठाण्यातील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेन आगेकूच करणार आहे. व शासकीय विश्रामगृह रस्त्यावर हा मोर्चा आडवण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होणार असल्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी श्रमजीवींकडून संबंधीत यंत्रणोसह निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन देऊन मोर्चाची सूचना दिली आहे.