निर्भयाः फाशीचा मार्ग मोकळा

| निर्भयाः फाशीचा मार्ग मोकळा । नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना उद्या २० मार्चला होणाऱ्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पतियाळा होऊस कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दोषींच्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. शेवटी ७ वर्षे, ३ महिने आणि ३ दिवसांनंतर निर्भयाच्या गुन्हेगारांना आता फाशी होणार आहे. | मात्र, दोषींनी शेवटपर्यंत फाशी टाळण्याचे कसे प्रयत्न केले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.